Toy

Toy
Joy of Toy

Monday, November 25, 2013

अनेक वर्षां पासून लोकं शोधत आहेत सुखाने मृत्यु येण्याचा मार्ग
आत्महत्या नव्हे,
शांतपणे, समाधानाने, डोळे मिटून घेताच पटकन
पण तो कसला
हवा तेव्हा येणार नाही चुकूनही
आणि येईल कधी तेंव्हा
अचानक, अवचित, घाला घातल्या सारखा आडवाटेने
दहशदवादी ह्हल्या सारखा
मृत्याे तू एवढा. बिभित्स कां?
काळ असूनही काळीज नाही तूला?
तूच अल्टीमेट सत्य असताना
काय तूलाच भिती असते न स्विकारले जाण्याची?
आणि म्हणूनच असा घातकी तू?
ये शांतपणे हवा तेव्हा, आपलासा बनून
आणि हो मुक्तीचा महामार्ग

Thursday, November 21, 2013


अनंत आमुची ध्येयासक्ती...
ö प्रसाद पाठक

फुटबॉल हा खेळ आपणा सर्वांना माहीत असेलच. क्रिकेटवेड्या आपल्या देशात फुटबॉलप्रेमी त्यामानाने कमीच असतील पण संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे. जगभरात जास्तीत जास्त देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडले की फुटबॉलविषयी मी का बोलतोय... तर हा खेळ नेहमी मला एका चांगल्या गोष्टीकडे, चांगल्या विचारांकडे प्रेरित करतो आणि तो विषय म्हणजे ‘ध्येय’!

फुटबॉल खेळात एका ठराविक आखलेल्या चौकटीत दोन विरूद्ध गोलपोस्ट असतात. दोन प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू आपापल्या सहकाऱयांकडे चेंडू सरकवित तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये मारून ‘गोल’ साधण्याचा अटोकाट प्रयत्न करीत असतात. अधिकाधिक गोल करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य असते व हे उद्दिष्ट्य गाठून अंतिमत: संघाला विजयी करण्याचे त्यांचे ‘ध्येय’ असते. सारे खेळाडू स्वप्रयत्नाने आणि संघभावनेने एकत्रितरीत्या या ध्येयासाठी खेळत असतात. असाच काहीसा प्रकार हॉकी, बेसबॉल, बास्केटबॉल आदी मैदानी खेळांमध्येही असतो. पण फुटबॉल हा जास्त लोकप्रिय असल्यामुळे त्याचे उदाहरण!

आपल्या सणांच्या संस्कृतीमध्येही असाच एक प्रकार हा ध्येय गाठण्याचा असतो आणि तो म्हणजे ‘दहिहंडी’. उंचावर बांधलेल्या दहिहंडीतले ‘ध्येय’ गाठण्यासाठी एकमेकांच्या मदतीने एकावर एक थर रचत; नवनवी उंची गाठत ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या दहिहंडी संस्कृतीचा पाया आहे.

या आणि अशा खेळांमधून ‘ध्येय’ गाठण्यासाठी मनाची म्हणजे मानसिक व शरीराची म्हणजे शारिरीक तयारी होणे महत्त्वाचे.

आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा आपला Bio-data सादर करतो. त्यात बरेचदा आपण आपल्या आयुष्यातील Objective, Aim, Purpose, Goal, Achivement आदींविषयी लिहीत असतो. हे लिहिताना आपल्याला बरेचदा सोप्पे वाटते किंवा आपण कुठुनतरी Copy-Paste करत असतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला या शब्दांचे महत्त्व आणि त्यांची आयुष्यातली आवश्यकता यांची माहिती असणे गरजेचे असते.

मनुष्य हा असा एकमेव प्राणी असावा ज्याला ‘मन’ या गोष्टीशी झुंजावे लागते. हे ‘मन’ नावाचे जे काही असते ते माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. अनेक इच्छा-आकांक्षा, स्वप्ने मनात घर करून असतात आणि त्यांच्या पूर्तीसाठी माणूस झगडत असतो. याच इच्छा-आकांक्षा, स्वप्नांना जर काही ठोस, कृतीशील प्रकारात माणसाने व्यक्त करायचे ठरविले तर ते त्याचे ‘ध्येय’ ठरू शकते. मग ते ध्येय वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असते.आपल्याला हवे ते मिळविण्यासाठीचे प्रयत्न करणे हे जर ध्येयाचे पहिले पाऊल मानले तर जस जसा माणूस वयाने मोठा होत जातो, अनुभवाने विचारी बनत जातो, तस तसे या इच्छा-आकांक्षांना एका विशिष्ट उद्दिष्ट्यापर्यंत नेणे हे क्रमप्राप्त ठरते आणि ते उद्दिष्ट्य गाठणे हे ध्येयपूर्तीचे अंतिम पाऊल असते.

कवी कुसुमाग्रज यांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ नावाची एक कविता आहे त्यात अथांग समुद्रवरून जगप्रवासाला निघालेला कोलंबस असे म्हणतो की, ’किनारा तुला पामराला...“ किनारा म्हणजे शेवट. हा सागराला असतो. माझ्यासारख्या सागरावरून जगप्रवासाला निघालेल्या प्रवाश्याला असा काही शेवट नसतो. त्या आधी ‘अनंत आमुची ध्येयासक्ती...’ असेही तो म्हणतो. म्हणजे अनेक प्रकारचे विचार, इच्छा, आकांक्षा मनात येत असतात आणि त्यातून अनंत गोष्टींचा ऊहापोह मनात होत असतो. या सर्व मंथनातून एक ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने त्या दिशेने वाटचाल करणे हेच माणसाने शिकले पाहिजे. अनुभवले पाहिजे. अंगिकारले पाहिजे. या ध्येयासाठी अथक प्रयत्न करणे, लक्ष विचलित होऊ न देता ध्येयाला आपले अंतिम ‘लक्ष्य’ बनविणे गरजेचे असते. असे करणे खूप अवघड असते पण त्यातच खऱया विजयाचा मार्ग दडलेला असतो. महाभारतात याचा एक उदाहरणस्वरूप प्रसंग आहे. कौरव-पांडव एकत्रितपणे गुरू द्रोणाचार्य यांचेकडे शस्त्रास्त्रविद्या व इतर ज्ञान मिळविण्यासाठी अध्ययन करीत असतात. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरू द्रोणाचार्य सर्व शिष्यांना एका बागेत घेऊन जातातआणि त्यांच्या धनुर्विद्येची परिक्षा घेण्याचे ठरवितात. त्यासाठी ते लांबवरच्या झाडावर एक खराखुरा दिसणारा परंतु लाकडापासून बनविलेला पक्षीöपोपट ठेवतात आणि शिष्यांना त्या पक्ष्याविषयी; लक्ष्याविषयी सांगून त्या पक्ष्याच्या डोळ्याचा बाणाने वेध घेण्यासाठी सांगतात. प्रत्येक शिष्याने बाणाने नेम धरला की, ते त्याला विचारीत ’बाळ! तुला समोर काय दिसते आहे?“ काही शिष्य सांगत की, मला आजूबाजूचे सर्व काही दिसते आहे. काही सांगत मला पक्षी, फळ, झाड, फांद्या इत्यादी दिसत आहे. असे करत-करत अर्जुनाची वेळ येते. गुरू द्रोण जेव्हा अर्जुनाला विचारतात ’बाळ! नेम धरल्यावर तुला काय दिसत आहे?“ तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले, ’गुरुवर्य! मला फक्त आणि फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे.“ असे म्हणून त्याने बाणाने पक्षाच्या; लक्ष्याचा वेध घेतला. म्हणजेच ज्या माणसाचे ‘लक्ष’ हे नेहमी फक्त आपल्या ध्येयाकडे; उद्दिष्टाकडे; लक्ष्याकडेच असते, त्याशिवाय त्याला काहीही दिसत नाही, त्यालाच ते ध्येय, लक्ष्य प्राप्त करता येते.
अनेक अडथळ्यांवर जिद्दीने मात करत त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गक्रमणा करणे आणि यशस्वी होणे यातील समाधानासारखा आनंद नाही. माणसाच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षणही तोच असतो, ज्यावेळी तो जे ध्येय ठरवितो ते प्रयत्नांती पूर्ण करून समाधानाचा आनंद मिळवतो आणि यशस्वी होतो. यशाचा आनंद हा वेगळाच असतो. आपण पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती करणे, आपण ठरविलेले उद्दिष्ट्य गाठणे यात कर्तव्यपूर्तीचा भाग असतो आणि अशी कर्तव्यपूर्तता आयुष्याला परीपूर्णता देते. म्हणूनच ध्येय ठेवतानाही ते सहज, सोप्पे ठेऊन उपयोगाचे नाही. ‘सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सुदूर... जे असाध्य... तेथे मन धावे’ असे मनात आणून निश्चित केलेल्या गोष्टीपर्यंत पोहोचून ती प्राप्त करणे यांत मिळणारा आनंद, समाधान हे निराळेच असते. दहिहंडीचेच पहा ना, ती जितकी उंचावर तितकी ती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न व त्यातील थरार हा यश, आनंद अधिक द्विगुणीत करणारा असतो. अशा ध्येयप्राप्तीतून तुम्ही स्वत:लाच नव्याने शोधत असता. तुम्ही स्वत:ला नव्याने सिद्ध करत असता. तुम्ही स्वत:ला नव्याने जगासमोर मांडत असता.

आपल्या आजुबाजूला समाजात अशी अनेक उदाहरणे पाहण्यात असतील, ज्यात त्या व्यक्तीने शुन्यापासून सुरूवात करून अथवा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, अथक प्रयत्न करत अंतिमत: आपले ध्येय प्राप्त केले आहे आणि त्यातच आपल्या आयुष्याचा आनंद उपभोगिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, दादासाहेब फाळके, आबासाहेब गरवारे, जनरल अरुणकुमार वैद्य, शंतनुराव किर्लोस्कर, धिरूभाई अंबानी, बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, धनंजय पिल्लै, ‘प्लाईंग सिक्ख’ मिल्खासिंगजी, सचिन तेंडुलकर, एकनाथ सोलकर, पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर असे अनेक मान्यवर आहेत ज्यांचा उल्लेख करत राहिलो तर केवळ त्यामुळेच हा अंक भरून जाईल. तुम्हीही आपापल्या परीने या यादीत भर घालू शकता. असो.

त्याच वेळी अशा यशात आपल्याबराबर मदतीला आलेल्या आपल्या सहकाऱयांनाही सामील करून घेणे आणि त्यातून आनंद वाटणे, वाढविणे, द्विगुणीत करणे हे आवश्यक आहे, यातून आपण समाजाचे ऋण फेडू शकतो.

छोट्या छोट्या गोष्टींच्या पूर्तीपासून ध्येयाची सुरूवात करून अधिकाधिक मोठे ध्येय गाठण्याचा निरंतर प्रयत्न करणे हे मनुष्य जीवनाचे सुत्र असणे आवश्यक आहे. अशा कृतींमधून एक आत्मविश्वास माणसामध्ये निर्माण होतो. जो मनुष्याला अधिक उद्दिष्टाचे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार करतो. अशा वेळी माणसाचे अंतिम ध्येय, उद्दिष्ट्य काय असले पाहिजे? याचा विचार केला तर, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या ‘याचसाठी केला होता सारा अट्टाहास... शेवटचा दिस गोड व्हावा’ या काव्यपंक्ती समोर दिसतात. अनेक निरनिराळ्या योनींच्या जन्मानंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो असे म्हटले जाते. या सर्व प्राणीमात्रांच्या जन्मामध्ये जीवला मोक्ष मिळत नाही पण मनुष्यजन्मामध्ये आपली कर्तव्ये, आपल्यावर असलेली मातृऋण, पितृऋण, देवऋण, गुरुऋण, मित्रऋण, समाजऋण, देशऋण इत्यादी ऋणे फेडून मनुष्य जीवन-मरणाच्या चक्रातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो व सर्वोच्च अशा मोक्षपदाला प्राप्त करून घेऊ शकतो. हे केवळ मनुष्यजन्मातच शक्य होते असे म्हटले जाते. त्यामुळे सर्वोच्च असे हे जे मोक्षप्राप्तीचे ध्येय आहे, ते मनुष्यजन्मात आल्यानंतर प्राप्त करणे हेच मनुष्याच्या जीवनाचे मुख्य सुत्र असले पाहिजे. या ध्येयापर्यंत पोहचण्याआधी जी काही कर्तव्ये अथवा ध्येये मनुष्यजन्माला दिली गेली आहेत, ती ओळखून, पार पाडून अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची धडपड चालू ठेवणे गरजेचे असते. ही धडपड कोणालाही टाळता येणे शक्य नाही पण या धडपडींलाच जीवनसंघर्ष मानून, तो पूर्ण करून एक एक ध्येय, उद्दिष्ट्य पूर्ण करणे आवश्यक आहे तेव्हाच तो शेवटचा दिस गोड होऊ शकतो.

Thursday, September 5, 2013

चरैवति...चरैवति

हा म्हणे चोर त्याला, तो म्हणे याला....
चोराचोरीच्या या खेळात, खरा चोर पळाला....
ज्याने मिळवले लोणी, तोच जिंकला बाजी
बाकी सारे करत राहती एकमेकांची 'हाजी'
जीव जाता म्हणती सारे होता तो एक भला
पण जीवित होता तेव्हा का नाही समजून घेतले त्याला
काळ-मांजर येत असे दबक्या पावलाने
कोण गेले, कोण राहिले, त्याला काय उणे?
प्रत्येकाला येथे पडला आपलाच सोस
का कशाला कुणी करावा खोटा 'अफसोस'
म्हणून म्हणतो स्वत:च बन तू एक सूर्य
मागू नको भीक प्रकाशाची, अन करत रहा कार्य

Friday, June 14, 2013

संचित


मोडलेले संचित सारे करुनी गोळा मी निघालो पुन्हा
उमटवित वळणावरती काही खाणा-खुणा..
जपल्या, पुसल्या, जरी काही आठवणी
चालत राहणे हेच असते सत्य हर क्षणी

थांबलो काही वेळा वाटले आलेच आपले ठिकाण
पण फसव्या त्या मृगजळाने कधी संपले का तहान
सोसावेना भार जेव्हा तेव्हा तुला आठविले
समजून तुला साथीला मग पाऊल पुढचे टाकिले

किती भेटले सोबती, राहिले काही,गेले काही
चालेन आणखी जोवर 'पूर्तता' (*) ती होत नाही
थांबेन क्षणभर तरीही एखाद्या हाके साठी
'कारण' मी जरी, कर्ता तू आहेस पाठी

- प्रसाद पाठक

(*पूर्तता माझ्या व्यथेची ... by suresh Bhat)

Thursday, June 13, 2013

ओढ

ओढ

परतूनी लवकर घरी ये रे सांगितले चिमण्यांना
ओढ तुझीच लागली आहे थकल्या पावलांना

तुज सांभाळले लडिवाळा, जेव्हा तू लहान होता
माझेच मला मी शोधिले, तुझ अक्षर शिकविता
घेसी भरारी मग, जेव्हा आभाळ गवसले पंखांना

जरी पडला, धडपडला सावरण्या होते मी
आयुष्य तुझे घडविण्या, जीवन जगले मी
सावरून मग मज आता, जाऊ दे पैलतीरांना

येईन मी घरात तूझिया, पुन्हा जन्म घेउनी
करवून घेईन लाड-कौतुक, कन्या तुझ्या घरची बनूनी
अन्य काही नको मज, सांगेन मी देवांना

Saturday, June 1, 2013

एक कोळी

एक कोळी

विचारांचं जाळं कोळीयाने विणलं
धागा धागा जोडून भक्कम केलं
गोल गोल फिरवून तंतुमय धागे
उभे-आडवे बांधले त्याने पुढे मागे
विचार करत करत केंद्रस्थानी बसला
‘काय मज्जा येईल जर एक कीटक फसला’
चिंतातूर जंतू, विचार करतो परंतू...
किंतू.... किंतू... किंतू...
कोळ्याच जाळं अन् जाळ्यातला कोळी
कसे होणार ‘सर्वेन सुखीन संतू:’ कधी काळी...?

Friday, May 31, 2013

रहाटगाडग

रहाटगाडग
कधी वर, कधी खाली
कधी भरलेलं, कधी रिकाम
चालवतय कुणीतरी अखंड किती काळ....
विश्वाच्या विहिरीवर खोल खोल अंत:करणातून भरभरून येणारं
भरलेलं रितं व्हायचं, कधीतरी... कुणासाठीतरी...
रितं झालेलं पुन्हा भरायच, कधीतरी... कुणासाठीतरी...
आपसूकच घडते सारे... आपल्याला हवे असो व नको...
बांधले गेलेले सारे आपण कोणत्यातरी आर्‍याशी, नियतीच्या चक्राशी...
स्पर्धा करणार कोणाशी...? कशासाठी?
रहाटगाडग्यातील गाडगीमडकी काही लहान काही मोठी
काही लाल, काही काळी, उथळ काही, काही खोल,
प्रत्येकाच्या अवकाशात ठरलेला सोस (भोग)
फुटलं जरी मडकं एखादं तरी अवकाश अवकाशात मिसळून जाते
फुटल्या जागी नवीन मडकं येते
बाकी उरते शून्य... गोल गोल... रहाटगाडग....

Saturday, April 27, 2013

एका हिरव्यागार कुरणी

खूप दिवसा पासून हे गाणे शोधत होतो आज अचानक मिळाले

एका हिरव्यागार कुरणी

एका हिरव्यागार कुरणी फुलली होती फुले
एक कळी उमलेच ना.. एक कळी उमलेच ना..

सूर्याच्या प्रकाशामधे मोहरली फुले
झुडुपांच्या कुशीत या दडली होती फुले
होती वेधक सातरंगी फुलली बाग सुरेख
एक कळी उमलेच ना.. एक कळी उमलेच ना..

वेलीवरल्या पानांमधून ओघळली फुले
टवटवीत ही हासत होती मोहक अत्‍तर फुले
झाली मलूल एक वेल कोमेजली तिची फुले
एक कळी उमलेच ना.. एक कळी उमलेच ना..

मंद धुंद रातराणी गंध वाहतो
रंग वेधतो गुलाब भान हेलावतो
विसरे सुवास या फुलांचा सुकली कोमल वेल
एक कळी उमलेच ना.. एक कळी उमलेच ना..

गीत-विजय बोंद्रे
संगीत-शांक-नील
स्वर-अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे
नाटक-गुहागर

http://www.aathavanitli-gani.com/Song/Eka_Hiravyagaar_Kurani

Wednesday, April 17, 2013


SINGLE, BUT NOT LONELY
India, along with China and Brazil, has recorded the fastest growth of single-person households. Purvaja Sawant asks Eric Klinenberg, the author of Going Solo: The Extraordinary Rise and Surprising Appeal of Living Alone, why urban dwellers the world over are choosing to live alone


    IN the past 50 years, living alone has become one of the most rapidly increasing social trends. Listed by Time magazine as the #1 idea that is changing and shaping our lives, the single life — for men and women — isn’t viewed as a social taboo anymore. On the contrary, it’s becoming one of the most popular lifestyle choices all over the world. In his book,
Going Solo: The Extraordinary Rise and Surprising Appeal of Living Alone, Eric Klinenberg, sociology professor at New York University, talks about the fascinating rise of sassy singletons, and reveals why solitary living is actually a sign of accomplishment.
Excerpts from an interview…
Most people confuse living alone with being alone...
Living alone, feeling alone, being lonely, and being isolated are four distinct conditions, but we often combine them. Singletons — my term for people who live alone — are generally neither lonely nor isolated. They are actually more likely to spend time with friends and neighbours than married people, and volunteer in civic organisations too.
A lot of people, even sociologists, believe that living alone is a sign of the disconnected world we inhabit these days...
Social isolation is worrisome, and so is loneliness. But living alone need not be. In fact, we can see it as a sign of accomplishment, because it requires affluence, social security, freedom of women, and cultural tolerance! It’s hard to go solo in a poor nation or neighbourhood; in contrast, it’s now ubiquitous in the world’s most developed and open societies.
Do you think people who live alone for a long time find it difficult to adjust to living with a partner or spouse later?
Yes, it takes adjustment. But there’s no evidence that it’s harder for people who’ve lived alone for a long time to stay married.
Why are more and more people finding the singleton life so appealing? 
First, let me say that very few people want to live alone forever. It’s not a life goal, but something that people choose to do at certain points in their lives. Most people do live with a partner for at least some part of their lives. That said, living alone comports with many of our most sacred modern values — freedom, control of one’s own time and space, the search for solitude and the capacity to socialise on our own terms, which is appealing to millions of people around the world. Today, people live alone wherever they can afford to do so and have the freedom to determine their own fate.
Is this generation more equipped to deal with the challenges of a solo life?
Yes, it’s more common today because there’s less stigma. Also, this generation has mostly grown up in a private bedroom, which means they know how to be alone. Moreover, social media has ensured that people live alone yet stay intensely connected to others — not just on the screen, but face-to-face as well. For all our anxieties about the problem of internet addiction, the heaviest users of social media are actually the people most likely to spend time with others face-to-face.
What’s the most common reason people gave for choosing to live alone?
It beats living with the wrong person — particularly a romantic partner, but also roommates and parents.
It’s often thought that soloists are people who haven’t found their match and are always on the lookout. Did people in your research talk about this misconception?
Probably, most singletons are interested in finding the perfect partner, but they are not always on the lookout. They get annoyed when their married friends and family members talk to them as if that’s all that matters. Too often, we project our own anxieties onto single people, rather than simply trying to understand their own desires and needs.
Which gender handles living alone better, and why?
Women are more likely to live alone, mostly because they outlive men. Women also do a better job of maintaining relationships with friends and family. They are less isolated, and more socially active.
Are people who live alone happier and enjoy life more than their married counterparts?
It’s hard to say. People who are successfully married do relatively well on conventional happiness measures. Do they enjoy life more? I don’t know how to assess that. But then there are all those who marry and then divorce or separate. People who live alone tend to be happier than them.
What are the disadvantages of leading a single life?
The disadvantages are that it’s expensive, sometimes impossibly so. It can be lonely, and if you get depressed while living alone, the problem can spiral out of control. Also, aging alone can be brutal, particularly if you are frail and poor.
    Then again, one of the most powerful things people told me in interviews is that, as hard as it can be to go solo, there’s nothing lonelier than living with the wrong person. And human history is full of people living, trapped, in marriages that are lonely and isolating. Living alone can be a way of escaping that.
You said in your book, many divorcees could choose to move in with roommates or family but prefer to stay on their own. Do you think people fear living with the wrong person more than living alone?
I wouldn’t say that. We are an optimistic species! Ever hopeful, we continue looking for the right person, even when we’ve been hurt in previous relationships.
Singletons are also largely perceived as selfish people...
It’s an old cultural baggage. The stigma of singlehood is already less biting than it used to be. It should continue to diminish in the coming years.
Are you advocating living alone?
No. Let’s be clear that Going Solo... is not a work of advocacy. I’m not championing living alone — after all, I’m married with two children, so that would be hypocritical. I’m trying to understand why so many people are going solo, and what this change means for our families, communities, cities, and personal lives.
What do your critics say about the book?
Some think it’s too optimistic, others think it’s actually sad and bleak. I think the book’s become a cultural Rorschach test. People have strong feelings about the issue, and the challenge is to suspend your pre-existing beliefs and see what the evidence really shows.
Did you reach any conclusion after researching for your book?
The conclusion I drew is that it’s our interdependence that makes our independence possible. Since we are more social and connected today, singletons find it easy to live on their own.
    TIMES NEWS NETWORK 

Wednesday, March 20, 2013

पहिला मराठी ज्ञानकोश





http://ketkardnyankosh.com


१९२० ते १९२९ ह्या काळात प्रकाशित झालेले डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर संपादित महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड हा पहिला मराठी ज्ञानकोश. ज्ञानाचा खजिना मराठी भाषेत कोशाच्या स्वरूपात पहिल्यांदा उलगडला त्याला आता ९० वर्षे उलटली. हे २३ खंड नंतर कधीच पुनर्मुद्रित झाले नाहीत. ९० वर्षांचे उन्हाळे-पावसाळे, पूर-पाणी सोसत टिकलेली, ९० वर्षांपूर्वीच्या कागदावर छापली गेलेली, दोऱ्याने बांधली गेलेली पुस्तके आणखी किती उन्हाळे-पावसाळे पाहतील? उगवत्या पिढ्यांसाठी मराठी भाषेतील तो ज्ञानाचा खजिना जपून ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.

Thursday, March 14, 2013

तो

साल 1993, मुंबई, पेडर रोड ऑफिस, तो आला, तो 20 /22 वर्षांचा, लहानसा, एयरपोर्ट एक्झिक्युटिव म्हणून. त्याचे ग्रॅजुएशन आणि कम्प्युटर कोर्स यावर सिलेक्शन झालेले. त्याला हिन्दी तर बोलता येत नव्हतेच पण तो केरळचा असल्याने इंग्लिशही तो साऊथ इंडियन स्टाइलने बोलायचा. पण काही तरी काम करण्याची प्रचंड इच्छा. मुंबईत राहायचे म्हणून गाव सोडून आलेला. एका उपनगरात पेईंग गेस्ट म्हणून रूम शेअर करायचा. त्याच्या बरोबर आणखी दोघे जणही सिलेक्ट झाले होते. पण याची जिद्दं निराळीच होती.


एयरपोर्ट एक्झिक्युटिव चे काम म्हणजे शिफ्ट ड्यूटी. एयरपोर्ट वर येणार्‍या, कंपनीच्या मेंबर्सना एटेंड करण व त्यांना गाईड करण. तसा फार काही बोलण्याचा प्रश्न नव्हता. पण कंपनी बद्दल नीट माहिती असण खूप जरूरी होत. त्यामुळे त्याची प्रचंड उत्सुकता असायची व त्याला ट्रैंनिंग देण्याची जवाबदारी मला देण्यात आली असल्याने तो मला अनेक गोष्टी सतत विचारायचा. त्याच्या मोडक्या-तोडक्या हिन्दी-इंग्लिश मधे. त्याची उत्तरे देता देता मलाच नको व्हायचे. काही सांगावे तरी प्रॉब्लेम, न सांगावे तरी प्रॉब्लेम.


मी व तो दोघांचाही रोजचा प्रवास एकाच रेल्वे मार्गावर (मध्य रेल्वे वर ) असल्यामुळे बर्‍याचदा तो प्रवासातही माझ्या बरोबरच असायचा. त्याचा या आधीचा जॉब, शिक्षण, कोर्स, गावाकडची घरची लोक आताच्या त्याच्या रूम वरची परिस्थिति, त्याचा रूम पार्टनर इत्यादि सर्व गोष्टींबद्दल बोलणी होत असत. मार्केटिंग बद्दलही तो खूप विचारायचा. incentive, कमिशन, पगार, इङ्क्रेमेंट या बद्दल त्याला खूप उत्सुकता असायची. मुंबई त्याला खुणवायची.


काही दिवसांनी काही कारणास्तव एयरपोर्ट एक्झिक्युटिव चे काम बंद झाले व त्याला मार्केटिंग टिम मधे घेतले गेले. इथे स्पर्धा, टार्गेट, परफॉर्मेंस, रीझल्ट यावर आपले स्थान टिकवणे गरजेचे असते आणि अवघडही असते. त्यातून त्याचा कम्युनिकेशनचा प्रचंड प्रॉब्लेम, त्यातच मार्केटिंग मधील पॉलिटिक्स या सर्वांमध्ये त्याचा कसा निभाव लागणार असे मला वाटायचे. एकंदरीतच तो लवकरच राजीनामा देवून नोकरी सोडून जाईल असेच वाटत होते.

दरम्यान माझी बदली दुसर्‍या ऑफिसला झाली व त्याचा डायरेक्ट संपर्क सुटला. आता कामानिमित्ताने, मिटिंगच्यावेळी त्याची भेट होत असे. माझ्याबद्दल त्याच्या नजरेतून आदरयुक्त भावना व्यक्त होताना पाहून मलाच बरेच वेळा संकोचल्यासारखे व्हायचे. त्याच्या काही अडचणी तो माझ्याकडे मोकळेपणाने बोलायचा आणि त्यातून हळू हळू का होईना पण त्याला मार्केटिंग जमत असल्याचे मला काळात होते. एखाद्या एक्झिक्युटिवच्या नावाने इनकमिंग कॉल्स खूप येवू लागले की एकतर तो एक्झिक्युटिव काहीतरी 'गडबड' करणारा असावा किंवा अतिशय प्रामाणिकपणे आऊट ऑफ द वे जाऊन सेवा देणारा असावा हे माझ्या तो पर्यंतच्या अनुभवावरून मला माहीत होते. पहिल्या क्याटेगरीत येणारेच मार्केटिंग executives अधिक असतात पण तो मात्र दुसर्‍या क्याटेगरीतला होता. खूप मेहनत घ्यायचा तो. त्याचे घर मुलुंडला, रेपोर्टिंग ऑफिस वडाळ्यालाआणि मार्केटिंगसाठी व सर्व्हिससाठी मुंबई भर अगदी churchgate पासून बोरीवली आणि VT पासून ठाणे, बदलापूर / बेलापुर पर्यन्त कुठेही फिरायला लागायचे. पण तो हे करायचा. त्याच्या चेहर्‍यावरचा (सेवा दिल्याचा) समाधानाचा, अनुभवाचा आनंदच ते सांगून जायचा. बर्‍याच वेळा खूप मेंबर्सच्या खूप काही अडचणीही तो घेवून यायचा व त्या सोडविण्यासाठी त्याची धडपड चालू असायची आणि म्हणूनच मला वाटते की त्याचे मार्केटिंग मधील स्थान अधिकाधिक बळकट होत गेले.


एक-दीड वर्ष असेच गेले. एव्हाना तो बर्‍यापैकी मार्केटिंगमध्ये रूळला होता. आपल्या सिनियरच्या बरोबरीने राहून त्याने स्वतःचे असे एक स्थानही निर्माण केले होते . त्याचे बोलणेही आतापर्यंत बरेच इफेक्टिव झाले होते. हिन्दी, इंग्लिश, दोन्ही संमिश्र करून तो आता न अडखळता बोलायचा. हिन्दी बोलताना एखादा शब्द सुचलाच नाही तर इंग्लिश शब्द वापरुन किंवा बंबाईया हिन्दी बोलून तो आपले काम मात्र बरोबर करून घ्यायचा. मेंबर गोळा करण, त्यांचे बुकिंग, त्यांच्या तक्रारी या बाबतीत तो स्वतःच खूप लक्ष घालायचा आणि 'कोणतीही मेहनत ही फुकट जात नाही' त्याप्रमाणे त्याचे मंथली मीटिंग मधे होणारे अभिनंदन हे त्याच्या यशाची कमान चढती आहे हेच दाखवत होते.

त्याच्या बरोबरीने मार्केटिंग मधे जॉइन झालेल्या बर्‍याच जणांना किंबहुना काही seniors ना सुद्धा मागे ठेवून तो आपल्या मेहंनतीच्या जोरावर मॅनेजमेंटच्या जवळ जाऊन पोहचला होता. आता त्याची स्वतःची अशी टीम होती. त्याचे स्वतःचे असे टेबल व कपाट होते. टीम मधील executives चे रेपोर्टिंग घेणे, त्यांचे टारगेट्स ठरविणे हे ही तो शिकला होता.. मीटिंग मधे होणार्‍या डिसकशन मधे बॉस हमखास एखाद्या सिचुएशन वा स्कीम बद्दल त्याला त्याचे मत काय आहे हे विचारायचा. खर म्हणजे त्याच्या बरोबर आधीच बॉसचे बोलणे झालेलेही असे पण मीटिंग मधे मुद्दाम त्याचे experiences(अनुभव) इतरांना शेअर करता यावे व त्याच्या प्रमाणे काम करण्याची सुबुद्धी इतरांनाही व्हावी या चांगल्या इच्छेनेच हे घडत होते. परंतु एकंदरीतच त्याचा परिणाम मात्र उलटच होत असल्याचे मला जाणवत होते. तो मॅनेजमेंटच्या 'जवळचा' आहे, 'लाडका' आहे, अश्या प्रतिक्रिया उठायच्या. त्याचा बर्‍यापैकी परफॉर्मेंस आहे याचा इतरांना त्रास व्हायचा आणि मग त्याच्या बद्दल द्वेष निर्माण व्हायचा(अर्थात हे तर सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणांत होत असतेच. ). पण एकंदरीतच त्याचे बरे चाललेले पाहून मला मात्र खूप समाधान वाटत होते. पण त्याचा कुठेही 'तोल' जावू नये असेही खूप वाटायचे.


Administration आणि मार्केटिंग यांच्यात नेहमीच एका प्रकारचा तणाव असतो हे मला सवयीने माहीत असल्याने माझ्याकडे त्याचे येणे हे आताशा मेंबर्सची वा मार्केटिंग मधील हमखास काहींना काही 'अडचण' घेवून येणारे असे. मला त्याच्यासाठी म्हणून काही वेगळा निर्णय घेणे व इतरांसाठी वेगळा निर्णय घेणे हे शक्य नव्हते. बर्‍याचदा त्यामध्ये काही नियमांना डावलून स्पेशल केसेस म्हणून काम करण्याची विनंती असायची. हे शक्य नव्हते. किंबहुना त्याने ही इतरांप्रमाणे या मार्गाने जावू नये असे मला मनापासून वाटायचे पण बर्‍याचदा आपल्याला मिळालेले स्थान टिकवण्यासाठी असे करणे त्याला भाग पडायचे. किंबहुना मॅनेजमेंटच त्याला तसे करण्यासाठी सुचवत असावी असे मला वाटते.. अर्थात मॅनेजमेंटचा 'हा' निर्णय official कधीच नसायचा व त्यामुळेच admin वाल्यांचा मार्केटिंग वाल्यांची कामे करून देताना प्रत्येक वेळी sanctions , authorisation , signatures नसेल तर प्रॉब्लेम यायचा पण तरीही त्याची प्रामाणिक धडपड पाहून मला त्याच्याबद्दल खूप काळजी वाटायची.


अशातच एकदा तो आला ते चक्क त्याच्या लग्नाचे आमंत्रण घेवूनच. मी त्याची आणि होणार्‍या नववधूची चौकशी केली. थोड्या संकोचानेच तो सांगत होता. एकीकडे अजून स्वतःचे घर घेतलेले नाही पण तो पर्यन्त ती गावीच राहील. मी लवकरच दुसरी जागा शोधत आहे, असे तो बरच काही सांगत होता. लग्न अर्थातच त्याच्या गावी म्हणजे केरळ मधे असल्याने माझे जाणे शक्यच नव्हते.


त्यानंतर तो मधून मधून भेटतच राहिला. मार्केटिंग मधून मिळणार्‍या 'incentive' च्या आमदानी मुळे जशी त्याची आर्थिक स्थिति सुधारली होती तशी लग्नानंतर घरून मिळणार्‍या डब्यामुळे व मानसिक समाधानामुळे त्याची शारीरिक स्थितीहि सुधारली होती. तो आहा बर्‍यापैकी 'सेट्टल' झाला होता.


त्या नंतर लवकरच समजले की तो त्याच्या नवीन घरात 'शिफ्ट' होतो आहे, हल्लीच त्याने नवीन घरासाठी कर्ज काढल्याचेही समजले आणि पाठोपाठच बातमी मिळाली की तो 'बाबा' ही बनणार आहे महणून. मनात खूप आनंद वाटत होता.

असे म्हणतात की सुखाचे क्षण आयुष्यात एकएकटे येतात तर संकटे वा दुक्खाचे क्षण आयुष्यात झुंडीने येतात कारण एकएकटे यायला ते घाबरतात. अचानक सगळ्या बाजूंनी संकटे एकदमच यावी त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत घडले. त्याच्या मुलाच्या जन्माच्यावेळी काही प्रॉब्लेम झाल्याचे कळले. जन्मतःच मुलाला डोळ्याचा काही त्रास होता व त्यामुळे त्याचेवर 2 /3 शस्त्रक्रिया करणे जरूरी होते. बरोबरीनेच गावाकडे त्याच्या वडिलांनाही हार्टचे दुखणे वाढल्याचे समजले.

पुढे काही दिवस त्याची मुलासाठी,घरासाठी,संसारासाठी,वडिलांसाठी होणारी धडपड मी पाहत होतो. सर्वांच्या खर्चाचा ताळमेळ घालताना होणारी त्याची ओढाताण पाहून त्याच्यातल्या जिद्दीला मी दाद देत होतो.


हल्ली तो फार कमी भेटायचा. पण जेव्हा केव्हा भेटायचा तेव्हा बरेच वेळा मार्केटिंग विषय सोडून इतर सारे बोलणे करायचं आणि त्याच्या चेहर्‍यावरील तनाव बरेच काही सांगून जायचा.


आणि त्या दिवशी 'ती' बातमी अचानक शॉक बसावा त्याप्रमाणे येवून थडकली. त्याला accident झाला होता व हॉस्पिटल मधे तो बेशुद्ध अवस्थेत होता. माझे मन सैरभैर झाले. खर तर नुकताच तो गवावरून परत आला होता. वडिलांच्या हार्टचे operation ची काळजी घेवूनच.


लग्न होवून झालेली 2 / 3 वर्षेच, मुलाचे दुखणे, नवीन घरासाठी घेतलेले कर्ज आणि आता वडिलांच्या हार्टचे दुखणे या सर्वांबाबतची काळजी त्याच्या मनावर परिणाम करून गेलेली होती आणि त्यातूनच तो त्याच्या 'कायनेटिक' वरून ऑफिसला येताना हायवेवर एका ट्रकने त्याला धडक मारली होती व तो तेथेच बेशुद्ध होवून पडला होता. धावपळ करून त्याला हॉस्पिटलला आयसीसीयू मधे ठेवले होते पण तो कोमातच होता.


त्याला पाहाण्यासाठी मी जेव्हा हॉस्पिटल मधे पोहचलो तेव्हा तेथील गंभीर वातावरण माला खूप काही सांगून गेले. डॉक्टर लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याच्यावर उपचार सुरू ठेवले होते पण ऑक्सिजनच्या नळकांडया, सलाइनच्या बाटल्या, डोक्यावरचे केस काढून केलेले ऑपरेशन, डोक्याची व हाता-पायाची इतर ब्याण्डेजेस खूप काही सांगत होती, ती कोमातच होता. आयसीसीयूच्या एका छोट्या खोलीत हिरव्या स्क्रीनवर वर-खाली होणार्‍या हिरव्या रेषांची हालचाल त्याच्या हृदयाची धडधड फक्त चालू आहे हे दाखवत होती.पण एकंदरीतच परिस्थिति, लक्षणे ठीक नव्हती.

हॉस्पिटल मधे एका बाजूला त्याची बायको,जवळ त्याचा छोटा मुलगा बसलेले होते तर दुसर्‍या बाजूलाच गाववरून नुकतेच ऑपरेशन झालेले वडील व इतर मंडळी बसलेली होती. काय बोलायचे त्यांच्याशी? कुणी कुणाला काय समजावायचे. काही बोलले नाही तरी डोळे मात्र चेहर्‍यावर सर्व काही उमटवून जातात. बायकोचे डोळे नुसते सुकून गेलेले होते. खिन्न चेहर्‍याने ती उदासपणे मुलाला घेवून बसलेली होती. माझ्या बरोबर माझे आणखीन दोन साथीदार होते पण आम्हाला कुणालाच त्यांची केरळाची भाषा येत नव्हती व त्यांना आमची.


मी सर्व धीर एकवटुन पुढे झालो व कंपनीने देवू केलेली काही रक्कम तिच्या हातात ठेवली. तिने काहीही न बोलता त्याकडे निस्तेजपणे पाहत मान खाली झुकवली व हात जोडले. काय बोलणार होतो मी तिला. माझ्या पेक्षा वयाने खूप लहान, दुक्खाचा पहाड कोसळला होता तिच्यावर. पुढच्या सर्व आयुष्याचा डोलारा कोसळत असताना ती काय करू शकणार होती आणि मी तरी तिला काय समजविणार होतो? मी तसाच परत निघालो...


पुढे 1 / 2 आठवडे तो तसाच कोमातच हॉस्पिटल मधे पडून होता. कोणीतरी त्याला भेटून येणारा येवून सांगत असे की तो आता प्रतिसाद देतो आहे म्हणून तर कोणी सांगत असे की काही खर नाही म्हणून. मग त्यानंतर त्याला मोठ्या हॉस्पिटल मधे 'शिफ्ट' केल्याचेही समजले. सर्व शक्य असलेले उपचार त्याच्यावर चालू होते पण हे किती काळ चालणार होते?


शेवटी एक दिवस तो 'गेल्याची' बातमी आलीच आणि मन पूर्णपणे सुन्न झाले. त्याच्या पहिल्या भेटी पासून सर्वात शेवटी त्याला कोमा मधे होस्पिटलात पाहिल्यापर्यंत सर्व भेटींची चित्रे डोळ्यासमोर नाचली. त्याचे येणे, जगणे, आणि विशेषतः त्याचे चटका लावून जाणे सारेच माला धक्का देणारे ठरले. एखाद्या वेळी सूर्य उगवतानाच त्याच्यावर ग्रहणाची छाया यावी पण ते ग्रहण कधी सुटूच नये या सारखे झाले होते.


आज साल 2011 , पण आजही मन त्याच्या आठवणीने सारखे भरून येते. शेवटचा श्वास घेताना कुठे असेल त्याचे मन, त्याचा आत्मा, किती तळमळला असेल तो ठोकर खावून कोसळताना व कोमात असताना?


त्याची बायको, मुलगा, वडील सर्वजण गावी परत गेलेले आहेत. त्याचे तेथे काय आणि कसे चालले आहे याची काही बातमी नाही.. पण त्याचे नवीन घेतलेले घर आजही तसेच खाली पडून आहे....

Saturday, March 9, 2013

पहिली पायरी

दोन चिता जळत होत्या जवळ जवळ शेजारी
एक खूप भडकलेली, विझु विझु झाली दुसरी

पहिली म्हणे दुसरीला का ग विझतेस इतक्यातच
आहे आपले अस्तित्व धुगधुगी वा जळण्यातच
का व्हावे दुखी आणि का खंत करी


आपण असलो कायमचेच मरणावर जरी
आणि आपले वास्तव्य सदैव सरणावर तरी
जीवना नंतरच्या जीवनाची आपणच पहिली पायरी

Friday, March 8, 2013


ओळख 

एक ओळख पुसताना घाव बसले कित्येक 
कुणा न उमगली वेदना, कुणास वाटे कौतुक 

होते अस्तित्व वर्षांचे, होते काही स्पर्शाचे
मुक्या भावनांना मोल नाही, मोल केवळ पैशांचे
ऋण-अनुबंध तुटती सारे, कोण जाने ही मेख 

काळाची ही तर्‍हाच न्यारी, कुणी न टिकला त्या पुढती 
तरीही पल्लवित होते फिरुनी, वेडी आशा या जगती
म्हणून बनवी अशीच ओळख, कालातीत ती एक

Tuesday, February 26, 2013

घाव पडता क्षणी...


तुटली वास्तू, फुटल्या गोष्टी, विसरल्या आठवणी
सरल्या कथा, उरल्या व्यथा आणि नयनात पाणी

उसवले धागेदोरे, काही श्वासांचे कंगोरे,
उघडया खपल्या, सार्‍या पुन्हा भळाळल्या
घाव पडता क्षणी, पुसत जुनी एक कहाणी

सावली सरली, बाहुली हरवली
खंत उरातच ठेवी, वाट पहात माऊली,
दोन्ही पाणावल्या नयनी

 एक एक दिवसांची गणती
करीत बोटे कधीची सुकली
अर्थ लागतच नाही, उगा काळास बोलणी

 काय होते, काय झाले, कोणे हिशेब ठेविले
कुणा वैर्‍याच्या दृष्टीने सारे काढूनची नेले
एका चिमण्या घरट्याची कोणी मोडीली बांधणी?