तुटली वास्तू, फुटल्या गोष्टी, विसरल्या आठवणी
सरल्या कथा, उरल्या व्यथा आणि नयनात पाणी
उसवले धागेदोरे, काही श्वासांचे कंगोरे,
उघडया खपल्या, सार्या पुन्हा भळाळल्या
घाव पडता क्षणी, पुसत जुनी एक कहाणी
सावली सरली, बाहुली हरवली
खंत उरातच ठेवी, वाट पहात माऊली,
दोन्ही पाणावल्या नयनी
एक एक दिवसांची गणती
करीत बोटे कधीची सुकली
अर्थ लागतच नाही, उगा काळास बोलणी
काय होते, काय झाले, कोणे हिशेब ठेविले
कुणा वैर्याच्या दृष्टीने सारे काढूनची नेले
एका चिमण्या घरट्याची कोणी मोडीली बांधणी?
No comments:
Post a Comment