ओढ
परतूनी लवकर घरी ये रे सांगितले चिमण्यांना
ओढ तुझीच लागली आहे थकल्या पावलांना
तुज सांभाळले लडिवाळा, जेव्हा तू लहान होता
माझेच मला मी शोधिले, तुझ अक्षर शिकविता
घेसी भरारी मग, जेव्हा आभाळ गवसले पंखांना
जरी पडला, धडपडला सावरण्या होते मी
आयुष्य तुझे घडविण्या, जीवन जगले मी
सावरून मग मज आता, जाऊ दे पैलतीरांना
येईन मी घरात तूझिया, पुन्हा जन्म घेउनी
करवून घेईन लाड-कौतुक, कन्या तुझ्या घरची बनूनी
अन्य काही नको मज, सांगेन मी देवांना
No comments:
Post a Comment