ओळख
एक ओळख पुसताना घाव बसले कित्येक
कुणा न उमगली वेदना, कुणास वाटे कौतुक
होते अस्तित्व वर्षांचे, होते काही स्पर्शाचे
मुक्या भावनांना मोल नाही, मोल केवळ पैशांचे
ऋण-अनुबंध तुटती सारे, कोण जाने ही मेख
काळाची ही तर्हाच न्यारी, कुणी न टिकला त्या पुढती
तरीही पल्लवित होते फिरुनी, वेडी आशा या जगती
म्हणून बनवी अशीच ओळख, कालातीत ती एक
No comments:
Post a Comment