Toy

Toy
Joy of Toy

Monday, June 27, 2011

काम आधी महत्वाचे की वारी?

काल एका वृतवाहिनीच्या बातम्यांमध्ये एक 'तथाकथित' वारकरी जो शिक्षकही आहे, सांगत होता, "मी दरवेळी वारीला जातो... त्यासाठी शाळेला सुट्टी मारतो..."
वा! जून महिन्यात शाळा सुरू होतात, आणि हा शाळांना सुट्टी मारतो. कुठे ती संत सेना न्हावी , गोरा कुंभार, सावता माळी, कबीर, जनाबाई आदि संत मंडळी जी आपल्या कामाला आधी महत्व द्यायची, आपल्या कामातच विठ्ठलाला पाहायची आणि कामातून वेळ मिळाल्यास वारी करायची. आणि म्हणूनच त्याच्या कामात खंड नको म्हणून प्रत्यक्षं विठ्ठलही त्यांच्या भेटीसाठी यायचा.

आणि कुठे आजचे 'तथाकथित' वारकरी, कामधाम सोडून एक तो निघाला म्हणून मीही निघालो या विचाराने, एकाने सरी घातली म्हणून मी दोरी घालणार अश्या अविचाराने वागतात. आणि फुकट खायला मिळते म्हणून कोणीही वारीला जातात, मग ती पंढरपूरची असू दे किंवा शिर्डीची, आणि वृतवाहिन्यावले सुद्धा त्यांचे समाज प्रबोधन करण्या ऐवजी एका वाहिनेने बातमी दिली म्हणून लगेच सार्‍या वाहिन्या पहिले आम्हीच च्या स्पर्धेत वारीच्या मागे धावतात आणि कोणाचेही कौतुक करत राहतात.

काम आधी महत्वाचे की वारी? हा जो उत्साह आहे, जे मनुष्यबळ आहे ते आपल्या नियत कर्मासाठी वापरण्या ऐवजी , कर्म सोडून इतर गोष्टीतच खर्च करतात. देवाने कधीच सांगितलेले नाही की आपले कामधाम, कर्तव्य, कर्म सोडून मला भेटायला या, वारी करा.

जरा तरी विचार करा!

1 comment:

Manoj Satalkar said...

बरोबर आहे सर कामाला अगोदर प्राधान्य दिलेच पाहिजे