एक कहाणी
शाळा सुटली पाटी फुटली
एक सानुली झाली रडवेली
संपली गम्मत संपली गाणी
निघुनि गेल्या सार्या मैत्रिणी
न्यावयास तिजला ना आले कोणी
भिरभिरती डोळे दाटुनी पाणी
काय करावे काही सुचेना
एकटेच किती थांबावे कळेना
इकडे तिकडे कितीदा पाही
'आई आज विसरली तर नाही?'
धीर मनाचा सर्व संपला
पायासही किती कळा लागल्या
वाटे तेथेच मारावी बसकण
द्यावे जोरात भोकड पसरून
तोच दिसले आजोबा दुरुनी
अश्रु पळाले हसू फुलवूनी
धावत सुटली ती सानुली
एक कहाणी अशी संपली
No comments:
Post a Comment