Toy
Wednesday, March 20, 2013
पहिला मराठी ज्ञानकोश
http://ketkardnyankosh.com
१९२० ते १९२९ ह्या काळात प्रकाशित झालेले डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर संपादित महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड हा पहिला मराठी ज्ञानकोश. ज्ञानाचा खजिना मराठी भाषेत कोशाच्या स्वरूपात पहिल्यांदा उलगडला त्याला आता ९० वर्षे उलटली. हे २३ खंड नंतर कधीच पुनर्मुद्रित झाले नाहीत. ९० वर्षांचे उन्हाळे-पावसाळे, पूर-पाणी सोसत टिकलेली, ९० वर्षांपूर्वीच्या कागदावर छापली गेलेली, दोऱ्याने बांधली गेलेली पुस्तके आणखी किती उन्हाळे-पावसाळे पाहतील? उगवत्या पिढ्यांसाठी मराठी भाषेतील तो ज्ञानाचा खजिना जपून ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.
Thursday, March 14, 2013
तो
साल 1993, मुंबई, पेडर रोड ऑफिस, तो आला, तो 20 /22 वर्षांचा, लहानसा, एयरपोर्ट एक्झिक्युटिव म्हणून. त्याचे ग्रॅजुएशन आणि कम्प्युटर कोर्स यावर सिलेक्शन झालेले. त्याला हिन्दी तर बोलता येत नव्हतेच पण तो केरळचा असल्याने इंग्लिशही तो साऊथ इंडियन स्टाइलने बोलायचा. पण काही तरी काम करण्याची प्रचंड इच्छा. मुंबईत राहायचे म्हणून गाव सोडून आलेला. एका उपनगरात पेईंग गेस्ट म्हणून रूम शेअर करायचा. त्याच्या बरोबर आणखी दोघे जणही सिलेक्ट झाले होते. पण याची जिद्दं निराळीच होती.
एयरपोर्ट एक्झिक्युटिव चे काम म्हणजे शिफ्ट ड्यूटी. एयरपोर्ट वर येणार्या, कंपनीच्या मेंबर्सना एटेंड करण व त्यांना गाईड करण. तसा फार काही बोलण्याचा प्रश्न नव्हता. पण कंपनी बद्दल नीट माहिती असण खूप जरूरी होत. त्यामुळे त्याची प्रचंड उत्सुकता असायची व त्याला ट्रैंनिंग देण्याची जवाबदारी मला देण्यात आली असल्याने तो मला अनेक गोष्टी सतत विचारायचा. त्याच्या मोडक्या-तोडक्या हिन्दी-इंग्लिश मधे. त्याची उत्तरे देता देता मलाच नको व्हायचे. काही सांगावे तरी प्रॉब्लेम, न सांगावे तरी प्रॉब्लेम.
मी व तो दोघांचाही रोजचा प्रवास एकाच रेल्वे मार्गावर (मध्य रेल्वे वर ) असल्यामुळे बर्याचदा तो प्रवासातही माझ्या बरोबरच असायचा. त्याचा या आधीचा जॉब, शिक्षण, कोर्स, गावाकडची घरची लोक आताच्या त्याच्या रूम वरची परिस्थिति, त्याचा रूम पार्टनर इत्यादि सर्व गोष्टींबद्दल बोलणी होत असत. मार्केटिंग बद्दलही तो खूप विचारायचा. incentive, कमिशन, पगार, इङ्क्रेमेंट या बद्दल त्याला खूप उत्सुकता असायची. मुंबई त्याला खुणवायची.
काही दिवसांनी काही कारणास्तव एयरपोर्ट एक्झिक्युटिव चे काम बंद झाले व त्याला मार्केटिंग टिम मधे घेतले गेले. इथे स्पर्धा, टार्गेट, परफॉर्मेंस, रीझल्ट यावर आपले स्थान टिकवणे गरजेचे असते आणि अवघडही असते. त्यातून त्याचा कम्युनिकेशनचा प्रचंड प्रॉब्लेम, त्यातच मार्केटिंग मधील पॉलिटिक्स या सर्वांमध्ये त्याचा कसा निभाव लागणार असे मला वाटायचे. एकंदरीतच तो लवकरच राजीनामा देवून नोकरी सोडून जाईल असेच वाटत होते.
दरम्यान माझी बदली दुसर्या ऑफिसला झाली व त्याचा डायरेक्ट संपर्क सुटला. आता कामानिमित्ताने, मिटिंगच्यावेळी त्याची भेट होत असे. माझ्याबद्दल त्याच्या नजरेतून आदरयुक्त भावना व्यक्त होताना पाहून मलाच बरेच वेळा संकोचल्यासारखे व्हायचे. त्याच्या काही अडचणी तो माझ्याकडे मोकळेपणाने बोलायचा आणि त्यातून हळू हळू का होईना पण त्याला मार्केटिंग जमत असल्याचे मला काळात होते. एखाद्या एक्झिक्युटिवच्या नावाने इनकमिंग कॉल्स खूप येवू लागले की एकतर तो एक्झिक्युटिव काहीतरी 'गडबड' करणारा असावा किंवा अतिशय प्रामाणिकपणे आऊट ऑफ द वे जाऊन सेवा देणारा असावा हे माझ्या तो पर्यंतच्या अनुभवावरून मला माहीत होते. पहिल्या क्याटेगरीत येणारेच मार्केटिंग executives अधिक असतात पण तो मात्र दुसर्या क्याटेगरीतला होता. खूप मेहनत घ्यायचा तो. त्याचे घर मुलुंडला, रेपोर्टिंग ऑफिस वडाळ्यालाआणि मार्केटिंगसाठी व सर्व्हिससाठी मुंबई भर अगदी churchgate पासून बोरीवली आणि VT पासून ठाणे, बदलापूर / बेलापुर पर्यन्त कुठेही फिरायला लागायचे. पण तो हे करायचा. त्याच्या चेहर्यावरचा (सेवा दिल्याचा) समाधानाचा, अनुभवाचा आनंदच ते सांगून जायचा. बर्याच वेळा खूप मेंबर्सच्या खूप काही अडचणीही तो घेवून यायचा व त्या सोडविण्यासाठी त्याची धडपड चालू असायची आणि म्हणूनच मला वाटते की त्याचे मार्केटिंग मधील स्थान अधिकाधिक बळकट होत गेले.
एक-दीड वर्ष असेच गेले. एव्हाना तो बर्यापैकी मार्केटिंगमध्ये रूळला होता. आपल्या सिनियरच्या बरोबरीने राहून त्याने स्वतःचे असे एक स्थानही निर्माण केले होते . त्याचे बोलणेही आतापर्यंत बरेच इफेक्टिव झाले होते. हिन्दी, इंग्लिश, दोन्ही संमिश्र करून तो आता न अडखळता बोलायचा. हिन्दी बोलताना एखादा शब्द सुचलाच नाही तर इंग्लिश शब्द वापरुन किंवा बंबाईया हिन्दी बोलून तो आपले काम मात्र बरोबर करून घ्यायचा. मेंबर गोळा करण, त्यांचे बुकिंग, त्यांच्या तक्रारी या बाबतीत तो स्वतःच खूप लक्ष घालायचा आणि 'कोणतीही मेहनत ही फुकट जात नाही' त्याप्रमाणे त्याचे मंथली मीटिंग मधे होणारे अभिनंदन हे त्याच्या यशाची कमान चढती आहे हेच दाखवत होते.
त्याच्या बरोबरीने मार्केटिंग मधे जॉइन झालेल्या बर्याच जणांना किंबहुना काही seniors ना सुद्धा मागे ठेवून तो आपल्या मेहंनतीच्या जोरावर मॅनेजमेंटच्या जवळ जाऊन पोहचला होता. आता त्याची स्वतःची अशी टीम होती. त्याचे स्वतःचे असे टेबल व कपाट होते. टीम मधील executives चे रेपोर्टिंग घेणे, त्यांचे टारगेट्स ठरविणे हे ही तो शिकला होता.. मीटिंग मधे होणार्या डिसकशन मधे बॉस हमखास एखाद्या सिचुएशन वा स्कीम बद्दल त्याला त्याचे मत काय आहे हे विचारायचा. खर म्हणजे त्याच्या बरोबर आधीच बॉसचे बोलणे झालेलेही असे पण मीटिंग मधे मुद्दाम त्याचे experiences(अनुभव) इतरांना शेअर करता यावे व त्याच्या प्रमाणे काम करण्याची सुबुद्धी इतरांनाही व्हावी या चांगल्या इच्छेनेच हे घडत होते. परंतु एकंदरीतच त्याचा परिणाम मात्र उलटच होत असल्याचे मला जाणवत होते. तो मॅनेजमेंटच्या 'जवळचा' आहे, 'लाडका' आहे, अश्या प्रतिक्रिया उठायच्या. त्याचा बर्यापैकी परफॉर्मेंस आहे याचा इतरांना त्रास व्हायचा आणि मग त्याच्या बद्दल द्वेष निर्माण व्हायचा(अर्थात हे तर सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणांत होत असतेच. ). पण एकंदरीतच त्याचे बरे चाललेले पाहून मला मात्र खूप समाधान वाटत होते. पण त्याचा कुठेही 'तोल' जावू नये असेही खूप वाटायचे.
Administration आणि मार्केटिंग यांच्यात नेहमीच एका प्रकारचा तणाव असतो हे मला सवयीने माहीत असल्याने माझ्याकडे त्याचे येणे हे आताशा मेंबर्सची वा मार्केटिंग मधील हमखास काहींना काही 'अडचण' घेवून येणारे असे. मला त्याच्यासाठी म्हणून काही वेगळा निर्णय घेणे व इतरांसाठी वेगळा निर्णय घेणे हे शक्य नव्हते. बर्याचदा त्यामध्ये काही नियमांना डावलून स्पेशल केसेस म्हणून काम करण्याची विनंती असायची. हे शक्य नव्हते. किंबहुना त्याने ही इतरांप्रमाणे या मार्गाने जावू नये असे मला मनापासून वाटायचे पण बर्याचदा आपल्याला मिळालेले स्थान टिकवण्यासाठी असे करणे त्याला भाग पडायचे. किंबहुना मॅनेजमेंटच त्याला तसे करण्यासाठी सुचवत असावी असे मला वाटते.. अर्थात मॅनेजमेंटचा 'हा' निर्णय official कधीच नसायचा व त्यामुळेच admin वाल्यांचा मार्केटिंग वाल्यांची कामे करून देताना प्रत्येक वेळी sanctions , authorisation , signatures नसेल तर प्रॉब्लेम यायचा पण तरीही त्याची प्रामाणिक धडपड पाहून मला त्याच्याबद्दल खूप काळजी वाटायची.
अशातच एकदा तो आला ते चक्क त्याच्या लग्नाचे आमंत्रण घेवूनच. मी त्याची आणि होणार्या नववधूची चौकशी केली. थोड्या संकोचानेच तो सांगत होता. एकीकडे अजून स्वतःचे घर घेतलेले नाही पण तो पर्यन्त ती गावीच राहील. मी लवकरच दुसरी जागा शोधत आहे, असे तो बरच काही सांगत होता. लग्न अर्थातच त्याच्या गावी म्हणजे केरळ मधे असल्याने माझे जाणे शक्यच नव्हते.
त्यानंतर तो मधून मधून भेटतच राहिला. मार्केटिंग मधून मिळणार्या 'incentive' च्या आमदानी मुळे जशी त्याची आर्थिक स्थिति सुधारली होती तशी लग्नानंतर घरून मिळणार्या डब्यामुळे व मानसिक समाधानामुळे त्याची शारीरिक स्थितीहि सुधारली होती. तो आहा बर्यापैकी 'सेट्टल' झाला होता.
त्या नंतर लवकरच समजले की तो त्याच्या नवीन घरात 'शिफ्ट' होतो आहे, हल्लीच त्याने नवीन घरासाठी कर्ज काढल्याचेही समजले आणि पाठोपाठच बातमी मिळाली की तो 'बाबा' ही बनणार आहे महणून. मनात खूप आनंद वाटत होता.
असे म्हणतात की सुखाचे क्षण आयुष्यात एकएकटे येतात तर संकटे वा दुक्खाचे क्षण आयुष्यात झुंडीने येतात कारण एकएकटे यायला ते घाबरतात. अचानक सगळ्या बाजूंनी संकटे एकदमच यावी त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत घडले. त्याच्या मुलाच्या जन्माच्यावेळी काही प्रॉब्लेम झाल्याचे कळले. जन्मतःच मुलाला डोळ्याचा काही त्रास होता व त्यामुळे त्याचेवर 2 /3 शस्त्रक्रिया करणे जरूरी होते. बरोबरीनेच गावाकडे त्याच्या वडिलांनाही हार्टचे दुखणे वाढल्याचे समजले.
पुढे काही दिवस त्याची मुलासाठी,घरासाठी,संसारासाठी,वडिलांसाठी होणारी धडपड मी पाहत होतो. सर्वांच्या खर्चाचा ताळमेळ घालताना होणारी त्याची ओढाताण पाहून त्याच्यातल्या जिद्दीला मी दाद देत होतो.
हल्ली तो फार कमी भेटायचा. पण जेव्हा केव्हा भेटायचा तेव्हा बरेच वेळा मार्केटिंग विषय सोडून इतर सारे बोलणे करायचं आणि त्याच्या चेहर्यावरील तनाव बरेच काही सांगून जायचा.
आणि त्या दिवशी 'ती' बातमी अचानक शॉक बसावा त्याप्रमाणे येवून थडकली. त्याला accident झाला होता व हॉस्पिटल मधे तो बेशुद्ध अवस्थेत होता. माझे मन सैरभैर झाले. खर तर नुकताच तो गवावरून परत आला होता. वडिलांच्या हार्टचे operation ची काळजी घेवूनच.
लग्न होवून झालेली 2 / 3 वर्षेच, मुलाचे दुखणे, नवीन घरासाठी घेतलेले कर्ज आणि आता वडिलांच्या हार्टचे दुखणे या सर्वांबाबतची काळजी त्याच्या मनावर परिणाम करून गेलेली होती आणि त्यातूनच तो त्याच्या 'कायनेटिक' वरून ऑफिसला येताना हायवेवर एका ट्रकने त्याला धडक मारली होती व तो तेथेच बेशुद्ध होवून पडला होता. धावपळ करून त्याला हॉस्पिटलला आयसीसीयू मधे ठेवले होते पण तो कोमातच होता.
त्याला पाहाण्यासाठी मी जेव्हा हॉस्पिटल मधे पोहचलो तेव्हा तेथील गंभीर वातावरण माला खूप काही सांगून गेले. डॉक्टर लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याच्यावर उपचार सुरू ठेवले होते पण ऑक्सिजनच्या नळकांडया, सलाइनच्या बाटल्या, डोक्यावरचे केस काढून केलेले ऑपरेशन, डोक्याची व हाता-पायाची इतर ब्याण्डेजेस खूप काही सांगत होती, ती कोमातच होता. आयसीसीयूच्या एका छोट्या खोलीत हिरव्या स्क्रीनवर वर-खाली होणार्या हिरव्या रेषांची हालचाल त्याच्या हृदयाची धडधड फक्त चालू आहे हे दाखवत होती.पण एकंदरीतच परिस्थिति, लक्षणे ठीक नव्हती.
हॉस्पिटल मधे एका बाजूला त्याची बायको,जवळ त्याचा छोटा मुलगा बसलेले होते तर दुसर्या बाजूलाच गाववरून नुकतेच ऑपरेशन झालेले वडील व इतर मंडळी बसलेली होती. काय बोलायचे त्यांच्याशी? कुणी कुणाला काय समजावायचे. काही बोलले नाही तरी डोळे मात्र चेहर्यावर सर्व काही उमटवून जातात. बायकोचे डोळे नुसते सुकून गेलेले होते. खिन्न चेहर्याने ती उदासपणे मुलाला घेवून बसलेली होती. माझ्या बरोबर माझे आणखीन दोन साथीदार होते पण आम्हाला कुणालाच त्यांची केरळाची भाषा येत नव्हती व त्यांना आमची.
मी सर्व धीर एकवटुन पुढे झालो व कंपनीने देवू केलेली काही रक्कम तिच्या हातात ठेवली. तिने काहीही न बोलता त्याकडे निस्तेजपणे पाहत मान खाली झुकवली व हात जोडले. काय बोलणार होतो मी तिला. माझ्या पेक्षा वयाने खूप लहान, दुक्खाचा पहाड कोसळला होता तिच्यावर. पुढच्या सर्व आयुष्याचा डोलारा कोसळत असताना ती काय करू शकणार होती आणि मी तरी तिला काय समजविणार होतो? मी तसाच परत निघालो...
पुढे 1 / 2 आठवडे तो तसाच कोमातच हॉस्पिटल मधे पडून होता. कोणीतरी त्याला भेटून येणारा येवून सांगत असे की तो आता प्रतिसाद देतो आहे म्हणून तर कोणी सांगत असे की काही खर नाही म्हणून. मग त्यानंतर त्याला मोठ्या हॉस्पिटल मधे 'शिफ्ट' केल्याचेही समजले. सर्व शक्य असलेले उपचार त्याच्यावर चालू होते पण हे किती काळ चालणार होते?
शेवटी एक दिवस तो 'गेल्याची' बातमी आलीच आणि मन पूर्णपणे सुन्न झाले. त्याच्या पहिल्या भेटी पासून सर्वात शेवटी त्याला कोमा मधे होस्पिटलात पाहिल्यापर्यंत सर्व भेटींची चित्रे डोळ्यासमोर नाचली. त्याचे येणे, जगणे, आणि विशेषतः त्याचे चटका लावून जाणे सारेच माला धक्का देणारे ठरले. एखाद्या वेळी सूर्य उगवतानाच त्याच्यावर ग्रहणाची छाया यावी पण ते ग्रहण कधी सुटूच नये या सारखे झाले होते.
आज साल 2011 , पण आजही मन त्याच्या आठवणीने सारखे भरून येते. शेवटचा श्वास घेताना कुठे असेल त्याचे मन, त्याचा आत्मा, किती तळमळला असेल तो ठोकर खावून कोसळताना व कोमात असताना?
त्याची बायको, मुलगा, वडील सर्वजण गावी परत गेलेले आहेत. त्याचे तेथे काय आणि कसे चालले आहे याची काही बातमी नाही.. पण त्याचे नवीन घेतलेले घर आजही तसेच खाली पडून आहे....

Saturday, March 9, 2013
पहिली पायरी
दोन चिता जळत होत्या जवळ जवळ शेजारी
एक खूप भडकलेली, विझु विझु झाली दुसरी
पहिली म्हणे दुसरीला का ग विझतेस इतक्यातच
आहे आपले अस्तित्व धुगधुगी वा जळण्यातच
का व्हावे दुखी आणि का खंत करी
आपण असलो कायमचेच मरणावर जरी
आणि आपले वास्तव्य सदैव सरणावर तरी
जीवना नंतरच्या जीवनाची आपणच पहिली पायरी

Friday, March 8, 2013
ओळख
एक ओळख पुसताना घाव बसले कित्येक
कुणा न उमगली वेदना, कुणास वाटे कौतुक
होते अस्तित्व वर्षांचे, होते काही स्पर्शाचे
मुक्या भावनांना मोल नाही, मोल केवळ पैशांचे
ऋण-अनुबंध तुटती सारे, कोण जाने ही मेख
काळाची ही तर्हाच न्यारी, कुणी न टिकला त्या पुढती
तरीही पल्लवित होते फिरुनी, वेडी आशा या जगती
म्हणून बनवी अशीच ओळख, कालातीत ती एक
Subscribe to:
Posts (Atom)