रहाटगाडग
कधी वर, कधी खाली
कधी भरलेलं, कधी रिकाम
चालवतय कुणीतरी अखंड किती काळ....
विश्वाच्या विहिरीवर खोल खोल अंत:करणातून भरभरून येणारं
भरलेलं रितं व्हायचं, कधीतरी... कुणासाठीतरी...
रितं झालेलं पुन्हा भरायच, कधीतरी... कुणासाठीतरी...
आपसूकच घडते सारे... आपल्याला हवे असो व नको...
बांधले गेलेले सारे आपण कोणत्यातरी आर्याशी, नियतीच्या चक्राशी...
स्पर्धा करणार कोणाशी...? कशासाठी?
रहाटगाडग्यातील गाडगीमडकी काही लहान काही मोठी
काही लाल, काही काळी, उथळ काही, काही खोल,
प्रत्येकाच्या अवकाशात ठरलेला सोस (भोग)
फुटलं जरी मडकं एखादं तरी अवकाश अवकाशात मिसळून जाते
फुटल्या जागी नवीन मडकं येते
बाकी उरते शून्य... गोल गोल... रहाटगाडग....